उद्धवना फक्त इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत!

By Admin | Updated: September 8, 2014 02:51 IST2014-09-08T02:51:51+5:302014-09-08T02:51:51+5:30

जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देऊन काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात़ त्यांच्या पक्षप्रमुखांना ‘लिफ्ट इरिगेशन’ स्किम नव्हे, तर फक्त त्यांच्या इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत आहे़

Uddhav knows only the 'lift' of the building! | उद्धवना फक्त इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत!

उद्धवना फक्त इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत!

क-हाड : ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देऊन काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात़ त्यांच्या पक्षप्रमुखांना ‘लिफ्ट इरिगेशन’ स्किम नव्हे, तर फक्त त्यांच्या इमारतीची ‘लिफ्ट’ माहीत आहे़ ते काय आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना लिफ्ट देणार, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली़
हणबरवाडी (ता़ कऱ्हाड) येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते़ पवार म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात भाजपा सरकार आले; पण आज शंभर दिवस झाल्यावर हे सरकार सामान्य जनतेसाठी ‘अच्छे दिन नव्हे, तर बुरे दिन’ घेऊन आल्याचे दिसत आहे़ कांदा उत्पादकांची काय अवस्था आहे, डाळिंब उत्पादकांची काय अवस्था आहे याचा अभ्यास करा़ खतांचे दरही वाढले आहेत; पण ‘स्वाभिमानी’ शेतकरीही त्यांच्याकडेच असल्याने आता यावर कोण बोलेना झालंय. त्यांचा खरा चेहरा आता तरी सर्वांनी ओळखायला पाहिजे़ राज्यासामोर विजेचा प्रश्न गंभीर आहे; पण विजेबाबत, कोळशाबाबत केंद्र सरकारची कोणतेही धोरण दिसत नाही़ त्यामुळे हे प्रश्न सोडविण्याचे आव्हान आपल्यासामोर आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Uddhav knows only the 'lift' of the building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.