शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

'शिवसेना संपायला उद्धव आणि आदित्य ठाकरेच जबाबदार,आता शिवसेना कदापि उभी राहणार नाही', नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 09:13 IST

Narayan Rane Criticize Uddhav Thackeray: शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून,मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली

सावंतवाडी - शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच सतत सरकार पडणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे सांगत शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ माणसाने पाडायची भाषा न करता अभिनंदन करावे, असे ही राणे म्हणाले.

केंद्रिय मंत्री राणे हे गोव्यावरून कणकवली कडे जात असताना सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संजू परब,अजय गोंदावले, लखम सावंत भोसले,बड्या कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी,दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,बंटी पुरोहित आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले,मुख्यमंत्री असतना आमदार खासदार यांना न भेटणे मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला असून,त्यामुळेच हे आमदार फुटले आहेत संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे न्याचे काम केले आहे.ठाकरे यांना मातोश्री दिसायचे आणि राणे यांना टार्गेट करणे हाच त्याचा एकमेव उद्देश होता.असे ही राणे म्हणाले पण मी सांगितल्या प्रमाणे हे सरकार कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले.आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करीत असून नवनवीन प्रकल्प राज्यात येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच चांगले कम करतील असा आपणास विश्वास असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल असे म्हटले होते त्यावर भाष्य करतना राणे यांनी महाराष्ट्र सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार राज्याच्या हिताचे नाही.त्यामुळे पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे असा टोला लगावला.

राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर बोलणे टाळत केसरकर यांच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स असे उत्तर दिले तर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या कौतुकावर बोलणे टाळत खरीच आमची आदरयुक्त भिती होती दहशतवाद करत बसलो नव्हता.किंवा मी मुख्यमंत्री आहे हे सांगावे लागत नव्हते असा टोला ही उध्दव ठाकरे यांना लगावला.

शिंदे फडणवीस आजच दिल्लीला गेलेतआमदार नितेश राणे हे मंत्री होणार का?या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळत पक्ष काय तो निर्णय घेईल असे सांगितले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच दिल्लीला गेले असून, अद्याप यादी तयार झाली नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार