शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 15:40 IST

‘मिशाला पीळ, माथाडीला पीळ आणि नंतर गीळ हा प्रकार सुरू असून, त्यांच्या चर्चेचं मी आव्हानं स्वीकारतो. त्यांना गाठायचं असेल तुर कुठेही गाठू शकतो; पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही,’

सातारा - ‘मिशाला पीळ, माथाडीला पीळ आणि नंतर गीळ हा प्रकार सुरू असून, त्यांच्या चर्चेचं मी आव्हानं स्वीकारतो. त्यांना गाठायचं असेल तुर कुठेही गाठू शकतो; पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही,’ असा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यावर नाव न घेता केला. सातारा येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी निर्धारनामा जाहीर केला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना हे उत्तर दिले. नगराध्यक्षा माधवी कदम, अ‍ॅड. दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.  खासदार उदयनराजे यांनी पाच वर्षांत करण्यात येणाºया कामांचा निर्धारनामा जाहीर केला. यावेळी त्यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपल्यावर टीका केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा उदयनराजेंनी त्याला प्रत्युत्तर दिले. महसूलमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले, ‘मी मनानं राजाच आहे. ते पदवीधरमधून निवडणूक लढवत होते. त्यावेळी आम्ही त्यांना मतदान केली व ते निवडून आले. त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आता बदललाय.’ शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले, ‘ते माझ्याशी देखणा आहे म्हणून चर्चेला बोलवतात की काम आहे म्हणून. माझी दहशत नाही. त्यांचं हे माकड चाळं आहेत.’ खासदार उदयनराजेंच्या जाहीरनाम्यात शेती, सिंचन आणि भारनियमन हे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे राहिले आहेत. शेतीवर उदरनिर्वाह करणारे ८० टक्के शेतकरी आहेत. त्यांना सक्षम बनविण्याची सर्वांचीच जबाबदारी असून, तसे होत नाही, ही शोकांतिका आहे. शेतक-यांसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताºयात होणार असून, आचारसंहितेनंतर त्याचे काम सुरू होईल. सातारा रेल्वे स्टेशन चांगले करण्याचा प्रयत्न आहे. तसेच साताºयात कृषी विद्यापीठ आणण्याचा मानस पाच वर्षांत पूर्ण होईल, असेही उदयनराजेंनी यावेळी सांगितले. तसेच या निर्धारनाम्यात रस्ते व दळवणवळण, पासपोर्ट कार्यालय, शैक्षणिक सुविधा, आरोग्य, कास धरण, औद्योगिक विकास, बेरोजगारांना रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि पर्यटन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताºयात भव्य स्मारक, कला आणि क्रीडाचा विकास आदींवर काम करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019