शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

“जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 12:09 IST

Udayanraje News: ...अन्यथा देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

Udayanraje News: छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही भेदभावाला थारा दिला नाही. जनगणना करा आणि आवश्‍‍यक आहे, त्‍याला आरक्षण द्या. मराठा म्‍हणून बोलत नाही. सगळी जण गुणवत्तेबाबत विचार करू लागले असून, मलाही वाटते गुणवत्तेवर आधारित आरक्षण असावे. आज प्रत्‍येक जण म्हणत आहे, आम्‍ही इतके. आम्‍ही तितके. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्‍याय, अधिकार मिळायचा असेल, तर जातीनिहाय जनगणना आवश्‍‍यक आहे. ती झाली की देऊन टाका ज्‍याचे त्याला जे पाहिजे ते. कशाला वाद. हात जोडून सगळ्यांना विनंती करतो. काय ते प्रश्‍‍न मिटवा, नाही तर देशाचे तुकडे होतील. वाट लागायला वेळ लागणार नाही, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मनोज जरांगे आज राज्‍यात फिरत आहेत. का फिरत आहेत. कशासाठी फिरत आहेत. कशामुळे ही वेळ आली. याचा विचार प्रत्‍येकाने करणे आवश्‍‍यक आहे. कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झाले. का, कशासाठी? का तर अन्‍याय झालाय म्‍हणून. जनगणना करा. कोणावरही अन्‍याय करू नका, असे माझे म्‍हणणे आहे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. 

जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढला, याचा शोध घेणे आवश्‍‍यक आहे 

जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढलाय, याचा शोध प्रत्‍येकाने घेणे आवश्‍‍यक आहे. प्रश्‍‍न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचे कसे, अशी विचारणा करत, प्रत्‍येकाला जगण्याचा, चांगले शिक्षण घेण्‍याचा अधिकार आहे. तो मिळालाच पाहिजे. त्‍यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. काय ते प्रश्‍‍न एकदा मिटवा. नाही तर देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले. 

दरम्यान, जालना येथे झालेल्‍या ओबीसी मेळाव्‍यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्‍ही पाडू, असे वक्‍तव्‍य करण्यात आले होते. याबाबत उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, पाडा... पाडा... मी म्‍हणतो. अजून काय बोलू. मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, असे सांगत उदयनराजेंनी त्‍या विधानाची खिल्‍ली उडवली. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण