शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसलेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत; म्हणाले, "प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:54 IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Udayanraje Bhosale : (Marathi News) सातारा :  येत्या काही दिवसांत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काही अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना तुम्ही आव्हान देणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले म्हणाले, "लोकशाही आहे, या लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार नाही. मला याबाबत फार बोलायचे नाही". यानंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना, तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे का? असा थेट प्रश्न विचारला. यावर 'माझी इच्छा जाऊ दे, तुमची इच्छा काय आहे?', असा प्रतिप्रश्न केला. मात्र, पुन्हा पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही."

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि २०१९ साली भाजपाकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आता आगामी निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपाचे उदयनराजे भासले अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा