उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 18:50 IST2017-04-11T18:50:22+5:302017-04-11T18:50:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला

उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 11 : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.
खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणंदच्या सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांकडून शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.