सातारा : 'मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असताना देखील आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,' असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले.
केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरी शिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र शासन तेही देऊ शकलेले नाही.'
- मराठा आरक्षण रद्द चा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा
- आता लोकांवर विष पिण्याची वेळ
- तरुण नक्षलवादी बनतील
- राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा
- जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण