उदया राज्यमंत्रिमंडळ विस्तार, खडसे यांचे महसूलमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे?
By Admin | Updated: July 7, 2016 20:21 IST2016-07-07T17:03:31+5:302016-07-07T20:21:06+5:30
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाला संधी मिळते आणि कोणाची गच्छंती होते हे पाहावं लागेल. एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रीपद सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे

उदया राज्यमंत्रिमंडळ विस्तार, खडसे यांचे महसूलमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. शुक्रवारी 8 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी ९ वाजता शपथविधी पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात १९ नव्या चेह-यांना संधी मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाला संधी मिळते आणि कोणाची गच्छंती होते हे पाहावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रीपद सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या बहुतप्रतिक्षित विस्तारात एकूण ९ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपाचे ४ , शिवसेनेचे २ आणि मित्रपक्षाच्या २ जणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांमध्ये सदाभाऊ खोत, महादेव जानकर, यांचा समावेश असून शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं नक्की झाल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपकडून मंत्रिपदासाठी पश्चिम महाराष्ट्र, सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सुभाष देशमुख आघाडीवर आहेत. तर मराठवाड्यातून संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नावे चर्चेत आहे. पश्चिम विदर्भातून पांडुरंग फुंडकर, दन येरावर यांची नावे पुढे येत आहेत. उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल या नावांची चर्चा आहे. रविंद्र चव्हाण यांचेही नोवे चर्चेत आहे.