शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

“नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:03 IST

Uday Samant Reaction Over ST Strike: गणेश भक्तांचा विचार करावा, भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

Uday Samant Reaction Over ST Strike: मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्या सूचनेनुसारच एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एक गोष्ट समजत नाही. गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असे असताना अशा प्रकारचे आंदोलन होणे हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली. चार वर्षापूर्वीच्या संपात माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. तशी भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला.  मी त्यांना विनंती केली की, सरकारमधील मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेण्याबाबत पत्र देतात, त्यामध्ये खरेपणा आहे. उद्या मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेतील तेव्हा चर्चा करा. तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल, अशाप्रकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडली. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्यासोबतही मी चर्चा करणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचारी आनंदात असला पाहिजे ही एकनाथ शिंदेंची भूमिका

एसटी कर्मचारी कायम स्वरुपी आनंदात असला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करतो असे सांगितले होते. जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. सरकार आपल्या निर्णाबाबत सकारात्मक आहे. आपणही गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की सकारात्मक होते, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळाबाबत काही निर्णय घेतले गेले. महिलांसाठी अर्धतिकीट असेल, ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास, यामुळे जो डिफरन्स आहे, तो शासनाने द्यायला सुरुवात केली. गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे मागे वाटत होते, त्याचे नुकसान भरण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो. सगळेच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आले आहे, असा दावा नाही. पण या योजनांमुळे एसटी महामंडळाला बऱ्यापैकी शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे, हे सगळ्या संघटनांना सांगितले. नवीन गाड्यांच्या बाबतीतही संघटनांशी चर्चा झाली. याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचे पत्र देण्याचा प्रयत्न आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डेपोतील जे कर्मचारी असतात, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत बैठक संपली, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपUday Samantउदय सामंत