शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:30 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेल्या नारजीबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्याच एका नेत्याने भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद होईल, असे म्हटले आहे.

भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणे योग्य नाही, अशी माझी भावना आहे. माझे हे वक्तव्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा टोमणा नाही. ही माझी खरी भावना आहे. भास्कर जाधव यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीवरचा राग काढला आहे. मी जवळचा माणूस असल्यामुळे त्यांचे ऐकून घेतो. म्हणूनच माझ्यावर राग काढतात. मात्र, ते जे काही बोलले त्या मातोश्रीच्या भावना होत्या. भास्कर जाधव हे मातोश्रीवर प्रचंड नाराज असल्याचे माध्यमातूनच समजले. मी ही त्यावर खुल्या मनाने सांगतो की, भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आम्हाला आनंद होईल, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव आले होते

एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही येऊ नका, असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त १२०० मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान, भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत.  एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव