शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 06:33 IST

सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून केंद्राकडे नावाची शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाचे भावी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती  उदय लळीत यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रमणा हे सरन्यायाधीश पदावरून येत्या २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लळीत हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. ते येत्या ८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६५व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असून, त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असेल.

सर्वोच्च न्यायालयातील न्या. उदय लळीत यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला. १९८३ पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयात ते वकिली करीत होते. त्यानंतर ते दिल्लीला आले. तिथे सर्वोच्च न्यायालयातील उत्तम वकील म्हणून ते नावारूपाला आले.  १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. 

सेवाज्येष्ठतेत लळीत यांच्यानंतर न्या. चंद्रचूड यांचा क्रमांक  सेवाज्येष्ठतेत न्या. उदय लळीत यांच्यानंतर न्या. धनंजय चंद्रचूड यांचा क्रमांक लागतो. चंद्रचूड यांचे वडील न्या. यशवंत चंद्रचूड यांनी १९७८ ते १९८५ या कालावधीत सरन्यायाधीशपद भूषविले होते. १९९१ साली सरन्यायाधीश झालेल्या न्या. कमल नारायण सिंह यांना सर्वांत कमी म्हणजे १७ दिवसांचा कालावधी मिळाला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUday Lalitउदय लळीत