टोलवरून यू-टर्न
By Admin | Updated: February 8, 2015 02:49 IST2015-02-08T02:49:26+5:302015-02-08T02:49:26+5:30
‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना असली तरी आम्ही निवडणूक घोषणापत्रात तसे कुठेही छापलेले नव्हते
टोलवरून यू-टर्न
टोलवाटोलवी : मुख्यमंत्री म्हणतात... ‘टोल रद्द करू’ असे म्हटलेच नव्हते !
मुंबई : ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना असली तरी आम्ही निवडणूक घोषणापत्रात तसे कुठेही छापलेले नव्हते. मात्र आगामी काळात अनेक टोल रद्द करू, असे सांगत टोलमुक्तीच्या आश्वासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घूमजाव केले. टोल रद्द करू, अशा घोषणा गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते विनोद तावडेंपर्यंत अनेकांनी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.
महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त विविध निर्णयांची माहिती देणारी पुस्तिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकाशित केली. सरकारच्या मूल्यमापनासाठी १०० दिवस अपुरे असल्याचे सांगत आम्ही घेतलेल्या निर्णयांपेक्षा त्यामागच्या हेतूंचे मूल्यमापन व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री राम शिंदे उपस्थित होते.
च्प्रशासकीय पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण
च्माहितीचा अधिकार आॅनलाइन करणार
च्चंद्रपुरात दारुबंदी
च्45 फोरेन्सिक युनिटची निर्मिती
च्रजेच्या दिवशी पोलिसांनी काम केल्यास त्यांना डबल पगार
च्उद्योगधंद्यासाठी पूरक वातावरण निर्माण केल़े
आता बघून घेऊ...!
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि आपल्यात कुठलीही धुसफुस नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, की माध्यमांनी हे चित्र रंगवले. राज्यपाल आले त्याआधी आम्ही दोघांनी एकत्र बसून चर्चा केली, चहा घेतला. मात्र राज्यपालांच्या स्वागतासाठी आम्ही सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर उभे असताना आम्ही एकमेकांकडे पाहिले नसल्याचे माध्यमांनी दाखवले. त्यावर शेजारी बसलेले खडसे म्हणाले, आता आपण एकमेकांकडे बघू... त्यावर दिवाकर रावते यांनी ‘आता बघू नव्हे, बघून घेऊ!’ अशी कोटी करताच एकच हशा पिकला.