टाइपरायटरची टिकटिक होणार बंद!
By Admin | Updated: January 16, 2016 01:23 IST2016-01-16T01:23:24+5:302016-01-16T01:23:24+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात

टाइपरायटरची टिकटिक होणार बंद!
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यामुळे टायपिंगची टिकटिक कायमची बंद होणार आहे.
आधुनिकतेची कास धरत टाइपरायटर बंद करून संगणकावर टायपिंगची परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने २०१३ साली घेतला होता. तेव्हापासून संगणक आणि टाइपरायटर अशा दोन्ही परीक्षा सुरू होत्या.
आता टाइपरायटरवरची शेवटची परीक्षा जून २०१६ला घेण्यात
येणार असून, त्यानंतर सर्व
परीक्षा संगणकावरच घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन परीक्षा
नागपूर : टायपिंंगचा सराव नसल्यामुळे संगणकावर काम करण्यास गती येत नसल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संगणकावर टायपिंगचा कोर्स सुरू केला. जीसीसी-टीबीसी
(गव्हरमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स) असा हा अभ्यासक्रम आहे.
या अभ्यासक्रमाची पहिली परीक्षा २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संगणकावर टायपिंगची होणारी ही पहिलीच आॅनलाइन परीक्षा आहे. जीसीसी-टीबीसीचा अभ्यासक्रम टायपिंग परीक्षेसारखाच आहे. परीक्षेचा वेळ ९० मिनिटांचा करण्यात आला असून, निकालही त्याच वेळेस लागणार आहे.