महिलेस मारहाण करणाऱ्यास दोनवर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: January 19, 2017 22:29 IST2017-01-19T22:29:03+5:302017-01-19T22:29:03+5:30
दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून महिलेस लाकडी दांड्याने मारहाण करणाऱ्या धनवाडी येथील गंगाराम भिमसींग बारेला

महिलेस मारहाण करणाऱ्यास दोनवर्षे सक्तमजुरी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.19 - दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून महिलेस लाकडी दांड्याने मारहाण करणाऱ्या धनवाडी येथील गंगाराम भिमसींग बारेला यास आज चोपडा न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व १५०० रुपये दंड ठोठवला. त्यातील १००० रुपये जखमी महिलेस वैद्यकीय खर्चासाठी देण्याचे आदेश दिले.
आरोपी गंगाराम बारेला याने किरणबाई भोला बारेला हीस दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे आरोपीने खाटीच्या लाकडी गात्याने तिला मारून जखमी केले होते. ही घटना ९ आॅगस्ट २०१० मध्ये घडली होती.सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. न्यायाधीश झेड. झेड. खान यांनी आरोपीस दोन वर्षे सक्त मजुरी व १५०० रुपये दंड, दंडांपैकी १००० फिर्यदिस नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले.