मुंबई विमानतळावर 16 लाखांच्या मुद्देमालासह दोन महिलांना अटक
By Admin | Updated: October 19, 2016 13:50 IST2016-10-19T13:50:14+5:302016-10-19T13:50:14+5:30
विमानतळावर दोन महिलांना 16 लाखांच्या मुद्देमालासहित अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे

मुंबई विमानतळावर 16 लाखांच्या मुद्देमालासह दोन महिलांना अटक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - विमानतळावर दोन महिलांना 16 लाखांच्या मुद्देमालासहित अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही महिला मीरा रोडला राहणा-या आहेत. शिवांगी पाटोदिया आणि शिवानी राज अशी या महिलांची नावे आहेत.
शिवांगी पाटोदिया आणि शिवानी राज या दोघी मंगळवारी रात्री बहारिनहून आल्या. गल्फ एअरच्या विमानाने त्या मुंबई विमानतळावर उतरल्या. त्यानंतर तपासणीदरम्यान कस्टम विभागाने ही कारवाई केली. दोघींकडून जवळपास 14.39 लाख किमतीचं 520 ग्रॅम सोनं, 1.77 लाख किमतीचे चार सॅमसंगचे फोन आणि 1 आयफोन असा 16.16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.