दोन महिला नक्षल्यांना चकमकीत कंठस्नान

By Admin | Updated: July 12, 2017 04:16 IST2017-07-12T04:16:17+5:302017-07-12T04:16:17+5:30

धानोरा तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येनगाव जंगल परिसरात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल यांच्यामध्ये उडालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या

Two women naxals encounter encounter | दोन महिला नक्षल्यांना चकमकीत कंठस्नान

दोन महिला नक्षल्यांना चकमकीत कंठस्नान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येनगाव जंगल परिसरात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल यांच्यामध्ये उडालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. गेल्या दोन दिवसांपासून नक्षल विरोधी अभियानात तीन महिला नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
नक्षलवादी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी येनगाव जंगलात शोधमोहीम राबविली. नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिसांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये दोघी ठार झाल्या. दोन्ही महिला नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते गडचिरोली येथे ओळख पटविण्यासाठी आणण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळावरून नक्षल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Two women naxals encounter encounter