लोणावळ्यातून दोन महिला बेपत्ता

By Admin | Updated: June 9, 2017 01:06 IST2017-06-09T01:06:32+5:302017-06-09T01:06:32+5:30

एक महिला आणि एक युवती बेपत्ता होण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

Two women missing from Lonavala | लोणावळ्यातून दोन महिला बेपत्ता

लोणावळ्यातून दोन महिला बेपत्ता


लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : येथून एक महिला आणि एक युवती बेपत्ता होण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण आहे.
रायवूड उद्यान परिसरात राहणारी ईमल देविदास वडते (वय ४५) ही महिला राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी सदर महिलेचे पती देविदास वडते यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १२ मे रोजी ईमल या गावाला (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) जाऊन येते म्हणून घरातून बाहेर पडल्या; पण गावाला पोहोचल्याच नाहीत. त्या रंगाने काळ्या सावळ्या व मध्यम चेहऱ्याच्या आहेत.
अण्णा भाऊ साठे वसाहत सिद्धार्थनगर लोणावळा येथून मीनल महेंद्र झोगडे (वय २२) ही युवती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मीनलची आई वंदना झोगडे यांनी फिर्याद दिली आहे. मीनल ही २० मे रोजी बँकेत जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती परत घरी आलीच नाही. ती रंगाने काळी सावळी व मजबूत बांध्याची आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा टॉप व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.

Web Title: Two women missing from Lonavala