चोरटय़ांच्या हल्ल्यात दोन महिला ठार

By Admin | Updated: December 14, 2014 01:52 IST2014-12-14T01:52:31+5:302014-12-14T01:52:31+5:30

यल्लम्मा देवी यात्रेला जाऊन घरी परतणा:या महिलांचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने दोन चोरटय़ांनी धारदार शस्त्रने केलेल्या हल्ल्यात दोन महिला जागीच ठार झाल्या.

Two women killed in thieves attack | चोरटय़ांच्या हल्ल्यात दोन महिला ठार

चोरटय़ांच्या हल्ल्यात दोन महिला ठार

मिरज  (जि.सांगली) : तालुक्यातील बेळंकी येथे यल्लम्मा देवी यात्रेला जाऊन घरी परतणा:या महिलांचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने दोन चोरटय़ांनी धारदार शस्त्रने केलेल्या हल्ल्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. सुनीता महादेव गायकवाड (35), मंगल सुधाकर घेवारे (45) अशी मृत महिलांची नावे आहेत. मृत दोघींसह पाच महिलांच्या अंगावरील 1 लाख रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बेळंकीत शुक्रवारपासून यल्लम्मा देवीची यात्र सुरू आहे.  बेळंकीतील गायकवाड वस्तीवरील महिला शनिवारी रात्री यात्रेस गेल्या होत्या. तेथून सुनीता गायकवाड, मंगल घेवारे, दीपाली गायकवाड, शकुंतला गायकवाड, कालिंदी गायकवाड या घरी परतत होत्या. (प्रतिनिधी)

 

Web Title: Two women killed in thieves attack