दर्शनासाठी दुतर्फा गर्दी
By Admin | Updated: June 24, 2014 23:32 IST2014-06-24T23:32:45+5:302014-06-24T23:32:45+5:30
विठुनामाचा गजर करीत लोणी काळभोर ते यवत हा सुमारे 28 कि.मी.चा मोठा टप्पा पार करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला.

दर्शनासाठी दुतर्फा गर्दी
>यवत : विठुनामाचा गजर करीत लोणी काळभोर ते यवत हा सुमारे 28 कि.मी.चा मोठा टप्पा पार करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला.
दौंड तालुक्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी पुणो-सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. सहजपूर फाटा, जावजीबुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा आदी ठिकाणी पालाखीने विसावा घेत मार्गक्रमण केले. आजचे पालखीच्या दोन मुक्कामामधील अंतर जास्त असल्याने काहीसा थकवा जाणवत होता. पालखीचे बैलदेखील थकले होते. रात्री साडेआठच्या सुमारास पालखीचे यवतमध्ये आगमन झाले. यवतमध्ये मुक्कामाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
यवतमध्ये पालखीचे स्वागत भीमा-पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सरपंच श्याम शेंडगे, उपसरपंच नाथदेव दोरगे, सदानंद दोरगे, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, शंकर दोरगे, दशरथ खुटवड, गुलाबराव खुटवड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे, बबन दोरगे, गणपत दोरगे, खंडू दोरगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यवत ग्रामपंचायतीच्या वतीने वारक:यांना विशेष सुविधा देत अंघोळीसाठी 5क्क् पेक्षा जास्त तोटय़ाची सोय केली होती, तर मोबाईल चाजिर्ंगसाठी खास बूथ तयार करण्यात आला होता. सालाबादप्रमाणो यंदाही यवत ग्रामस्थांनी पिठले-भाकरीची पारंपरिक मेजवानी दिली. हजारो भाकरी तयार करण्यात आल्या होत्या.
तुकाराम महाराज पालखी यवतकडे मार्गस्थ
लोणी काळभोर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून सकाळी यवतकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी लोणी फाटय़ार्पयत जाऊन पालखीला निरोप दिला. या सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर चिंचवड येथील ज्योती कोल्हे व प्रवीण मोटे ही बहीण-भावंडे रांगोळीच्या आकर्षक पायघडय़ा घालून सेवा करीत आहेत.
मंगळवारी सकाळी पालखी सोहळ्यातील वारक:यांनी योगिनी एकादशीचा उपवास सोडला. पालखी सोहळा सकाळी 8 वाजता पंढरपूरच्या दिशेने लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या वर्षी या सोहळय़ामध्ये एकूण 33क् दिंडय़ा सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये 27 दिंडय़ा रथापुढे, तर 3क्3 दिंडय़ा रथामागे आहेत.
अद्याप पाऊस न पडल्याने पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे या वर्षी वारक:यांची संख्या कमी असल्याची माहिती सोहळा प्रमुख सुनील मोरे यांनी दिली. पालखी थेऊरफाटा येथे आली तेथे थेऊरचे सरपंच नवनाथ काकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव काकडे, रामभाऊ कुंजीर, यशवंतचे कामगार नेते तात्या काळे, ज्ञानोबा किसन कुंजीर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले. या ठिकाणी थेऊर ग्रामपंचायत व रामकृष्णहरी सहकारी पतसंस्था, तसेच राईज अॅण्ड शाईन कंपनीच्या वतीने पाणी व केळीचे वाटप केले.
4कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भोंडरे व उपसरपंच संतोष कुंजीर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, पृथ्वीराज काकडे स्वागतासाठी उपस्थित होते. हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला तेव्हा पेठ गावच्या हद्दीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक अनिल श्रीवास्तव, दीपक करंजकर, संजीव केदारी, अनिल जिंदाल व इतर अधिकारीवर्ग, ग्रामपंचायत पेठच्या वतीने बापू चौधरी व किशोर शिंदे यांनी या सोहळ्याचे स्वागत केले.
4या वेळी तंटामुक्तीचे जिल्हा समन्वयक रघुनाथ चौधरी उपस्थित होते. पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी येथे पोहोचला. त्या वेळी सरपंच दत्तात्रय कांचन, उपसरपंच संगीता लोंढे, ग्रामविस्तार अधिकारी संपत खरपुडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले.