दुचाकी- कंटेनरची धडक; मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: May 26, 2016 22:21 IST2016-05-26T22:21:46+5:302016-05-26T22:21:46+5:30
दुचाकी आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़

दुचाकी- कंटेनरची धडक; मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 26 - दुचाकी आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ ही घटना अणदूर गावाजवळील हॅलो मेडिकल फाऊंडेशनजवळ घडली.
सुनंदा शिवानंद पारशेट्टी आणि आनंदा शिवानंद पारशेट्टी (वय- २२, रा. कुंभारी, या. द. सोलापूर) असे मरण पावलेल्या दोघा मायलेकांची नावे आहेत. मयत मायलेक दोघेही एम. एच. १३ बी. जी. ८१८४ या मोटारसायकलवरुन सोलापूरकडेयेत होते़ यावेळी अणदूर गावाजवळील हॅलो मेडिकल फाऊंडेशन समोरील रोडवरुन समोरुन येणाऱ्या एम. एच. ४६/७६६६ या कंटेनरने जोराची धडक दिल्याने सुनंदा पारशेट्टी या जागीच मरण पावल्या़ यावेळी आनंदा पारशेट्टी हा गंभीर जखमी झाला होता़ त्यास उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आनंदा याचाही अंत झाला. या घटनेची माहिती समजताच कुंभारी (सोलापूर) गावातील ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती़ या घटनेने कुंभारी गावावर शोककळा पसरली़.