शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत बळीराजाचे २ हजार कोटी वाचले! अडत मुक्तीमुळे व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:48 IST

शेतक-यांच्या मानेवरील अडतीचे जोखड राज्य सरकारने उखडून फेकल्यानंतर गेल्या दोन वर्षांत बळीराजाची तब्बल दोन हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे.

- योगेश बिडवईमुंबई : शेतक-यांच्या मानेवरील अडतीचे जोखड राज्य सरकारने उखडून फेकल्यानंतर गेल्या दोन वर्षांत बळीराजाची तब्बल दोन हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे.शेतक-यांना भुसार मालासाठी ३ टक्के आणि कांदा, बटाट्यासह फळे व भाजीपाल्यासाठी ६ टक्के अडत द्यावी लागत होती. ५ जुलै २०१६ मध्ये राज्य सरकारने कृषी उत्पन्न खेरदी विक्री अधिनियमात बदल करून शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर आकारण्यात येणारी अडत शेतक-यांऐवजी खरेदीदार अर्थात व्यापाºयांकडून घेण्याची कायद्यात तरतूद केली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८०० कोटींहून अधिक व २०१७-१८ मध्ये राज्यातील शेतकºयांचे आतापर्यंत १,२१३ कोटी रुपये वाचले. ही अडत व्यापाºयांकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्रालयाच्या बाजार समिती विभागाने ‘लोकमत’ला दिली.अडतबंदीच्या विरोधात तेव्हा व्यापाºयांनी महिनाभर खरेदी थांबवली होती. मात्र शेतकरी हितावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम राहिल्याने पुढे शेतकºयांचा मोठा फायदा झाला, असे तत्कालीन अडत समितीचे शेतकरी सदस्य आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.कायद्याआधी १२ वर्षांत ११ हजार कोटींची लूटनव्या कायद्याआधी शेतकºयांची एप्रिल २००४ ते जून २०१६ या कालावधीत अडतीच्या माध्यमातून तब्बल ११ हजार कोटींपेक्षा अधिक लूट झाली. राज्यातील शेतकºयांनी वर्षाला सरासरी ९८१ कोटी अडत दिली. ५ जुलै २०१६ नंतर मात्र ही अडत व्यापाºयांकडून वसूल केली जात असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वाचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे शेतकरी आता खºया अर्थाने बाजार समितीचे मालक होणार आहेत. शेतमालावर एकदा बाजार शुल्क (सेस) वसूल केल्यानंतर दुसºया बाजार समितीत त्याच मालावर पुन्हा सेस घेण्यावरही सरकारने प्रतिबंध घातला. ‘वन टाईम सेस’मुळे खरेदी विक्री अधिक सुलभ झाली.- सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी