डोंबिवलीत दोन मजली इमारत कोसळली
By Admin | Updated: July 4, 2017 14:37 IST2017-07-04T14:11:56+5:302017-07-04T14:37:51+5:30
डोंबिवलीत आयरे रोडवरील गंगाराम केणे निवास ही दोन मजली धोकादायक इमारत कोसळली आहे.

डोंबिवलीत दोन मजली इमारत कोसळली
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 4 - पावसाळयात पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी दुपारी डोंबिवलीच्या आयरे रोडवरील मल्हार गार्डन जवळची गंगाराम केणे निवास ही दोन मजली धोकादायक इमारत कोसळली. दोन कुटुंब या इमारतीत रहात होती. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने कोणीही या इमारतीत नसल्याने जिवीतहानी टळली.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारची चार मजली इमारत तातडीने रिकामी करण्यात आली असून, या इमारतीत रहाणारे रहिवाशी भेदरलेल्या अवस्थेत आहेत. यापूर्वी सुद्धा पावसाळयात डोंबिवली, मुंब्रा भागात काही धोकादायक इमारती कोसळल्या असून, यामध्ये मोठया प्रमाणावर प्राणहानी झाली आहे.