मुंबई जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या
By Admin | Updated: July 19, 2016 16:20 IST2016-07-19T15:53:55+5:302016-07-19T16:20:48+5:30
डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका बुडल्या. सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मुंबई जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका बुडल्या. सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही तसेच बंदरातील नौदलाच्या सागरी संपत्तीचे नुकसान झाले नाही असे सूत्रांनी सांगितले.
बंदरात उभ्या असलेल्या दोन पैकी एका बोटीला आग लागली. ही आग जवळच्याच दुस-या बोटीपर्यंत पसरली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाणी आत शिरले व दोन्ही बोटी बुडाल्या.
बुडालेल्या बोटी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही नौका आकाराने छोटया होत्या. सागरी गस्तीसाठी त्यांचा वापर व्हायचा.