शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोघा सरपंचांसह पाच जणांवर होणार फौजदारी दाखल

By admin | Updated: May 7, 2014 01:48 IST

सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत.

तिळवणला १७ लाखांचा अपहार : सुखदेव बनकर यांचे गटविकास अधिकार्‍यांना आदेशनाशिक : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील हरियाली कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास व वृक्ष लागवडीत सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत.यासंदर्भात १५ मार्च २०१४ रोजीच गटविकास अधिकार्‍यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून झालेल्या अपहाराची रक्कम पंचायत समितीकडे भरण्याचे पत्र दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही यासंदर्भात नोटिसींना साधे उत्तरही देण्याचे सौजन्य या लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी दाखविलेले नाही. १५ मार्च २०१४ च्या पत्रानुसार हरियाली पाणलोट विकास कार्यक्रमात तत्कालीन सरंपच वसंतराव गुंजाळ, ग्रामसेवक ए. ए. ठोक व विस्तार अधिकारी ए. के. गोपाळ यांच्यावर प्रत्येकी चार लाख ९५ हजार ५६८ रुपयांची वसुली दाखविण्यात आली असून, वृक्ष लागवडीत सरपंच इंदूबाई जगताप, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी ए. के. गोपाळ यांच्यावर प्रत्येकी ७५ हजारांची वसुली दाखविण्यात आली आहे. मंगळवारी संबंधित तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेऊन या अपहार प्रकरणी दोेन महिने उलटूनही काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार करताच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दोन दिवसांत या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)