कोकण रेल्वेत लुटणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशात अटक
By Admin | Updated: September 27, 2016 02:02 IST2016-09-27T02:02:25+5:302016-09-27T02:02:25+5:30
कोकण रेल्वेतील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील दोघाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली. विष्णू रामाश्रय पांडे (वय २४) व कृष्णकुमार
कोकण रेल्वेत लुटणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशात अटक
रत्नागिरी : कोकण रेल्वेतील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील दोघाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली. विष्णू रामाश्रय पांडे (वय २४) व कृष्णकुमार रामाश्रय पांडे (२७, सनगरा मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेलन थॉमस डिसिल्वा या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधूनआपल्या कुटुबांसोबत २७ जून २०१५ ला मडगाव ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. मडगावहून सायंकाळी निघालेली ही रेल्वे रात्री १२.४५ वाजण्याचा सुमारास रत्नागिरी स्थानकावर दाखल झाली. त्या वेळी त्या झोपी गेल्या होत्या. तीच वेळ साधत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेसह सुमारे एक लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत काही संशयितांचा सुगावा रत्नागिरी पोलिसांना लागला होता. या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)
सात ते आठ जणांची टोळी
प्रवाशी झोपेत असल्याचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटून लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर घडलेले अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही टोळी सात ते आठ जणांची असल्याचे पुढे येत आहे.