अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार
By Admin | Updated: August 25, 2014 03:19 IST2014-08-25T03:19:27+5:302014-08-25T03:19:27+5:30
लग्नाचे आमिष दाखवून गोवंडीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून गोवंडीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली आहे.
गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात पीडित मुलगी राहते. काही दिवसांपूर्वी ही मुलगी अचानक गायब झाली. याबाबत तिच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र गुरुवारी अचानक ती पुन्हा घरी परतली. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने शंकर राजभर याच्यासोबत गेल्याचे सांगितले. त्यानुसार तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी शिवाजीनगर पोलिसांत शंकर आणि त्याचा मित्र ताहीर शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शंकरला अटक केली. (प्रतिनिधी)