नागपूर कारागृहातून पळालेल्या २ कैद्यांना मध्य प्रदेशात अटक
By Admin | Updated: May 14, 2015 21:10 IST2015-05-14T18:43:06+5:302015-05-14T21:10:04+5:30
नागपूर कारागृहातून दोन महिन्यांपूर्वी फरार झालेल्या दोन कैद्यांना पोलिसांनी मध्य प्रदेशमधील बैतुल येथे अटक केली आहे.

नागपूर कारागृहातून पळालेल्या २ कैद्यांना मध्य प्रदेशात अटक
ऑनलाइन लोकमत
बैतुल (मध्य प्रदेश), दि. १४ - नागपूर कारागृहातून दोन महिन्यांपूर्वी फरार झालेल्या दोन कैद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शोएब खान, प्रेम नेपाळी या दोघांना पोलिसांनी मध्य प्रदेशमधील बैतुल येथे अटक केली.
३१ मार्च रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी फरार झाले होते. त्या घटनेनंतर कारागृहात धाडसत्र सुरू होऊन ६० हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्याच शहरातून कैदी फरार होण्याच्या या घटनेमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर दोन कैद्यांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र उर्वरित तीन कैदी अद्याप फरार आहेत.