कल्याण आधारवाडी कारागृहातून २ कैदी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 14:55 IST2017-07-23T14:55:59+5:302017-07-23T14:55:59+5:30
मुंबई, दि. २३ - कल्याण आधारवाडी कारागृहातील दोन अट्टल दरोडेखोरांनी रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळ काढला.

कल्याण आधारवाडी कारागृहातून २ कैदी पळाले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - कल्याण आधारवाडी कारागृहातील दोन अट्टल दरोडेखोरांनी रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळ काढला. मणीटंडन नाडर आणि डेव्डिड देवेंद्रन अशी या दोन कैद्यांची नावे असून, खडकपाडा पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.