लाच घेताना दोन पोलिसांना अटक
By Admin | Updated: October 31, 2015 02:16 IST2015-10-31T02:16:59+5:302015-10-31T02:16:59+5:30
आरोपीच्या सोयीचे दोषारोप पाठविणे व सोरटच्या हप्ता यासाठी अकरा हजारांची लाच घेताना कर्जत पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना नाशिक येथील लाचलुचपत

लाच घेताना दोन पोलिसांना अटक
कर्जत (अहमदनगर) : आरोपीच्या सोयीचे दोषारोप पाठविणे व सोरटच्या हप्ता यासाठी अकरा हजारांची लाच घेताना कर्जत पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस नाईक आण्णा तुळशीराम पवार (४५), पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब उद्धव क्षीरसागर (३०) अशी त्यांची नावे आहेत. राशिन येथील तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. राशिन येथे १० डिसेंबर २०१४ रोजी जुगार अड्ड्यावर छापा पडला होता.
यामध्ये १७ आरोपी होते. या आरोपींचे सोयीचे दोषारोप न्यायालयात पाठवणे व सोरटचा हप्ता या दोन्हींचे मिळून २१ हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी १० हजार यापूर्वीच दिले.
उर्वरित अकरा हजार रुपये घेताना शुक्रवारी दुपारी राशिन रोडवरील चहा स्टॉलवर आण्णा पवार या पोलीस कर्मचाऱ्यास या पथकाने रंगेहात पकडले. फोन रेकॉर्र्डींगमध्ये दादा क्षीरसागर यांचे नाव आले. यामुळे या दोघांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)