दोन पोलीस निरीक्षकच गायब

By Admin | Updated: November 5, 2016 04:20 IST2016-11-05T04:20:22+5:302016-11-05T04:20:22+5:30

‘हरवले आहेत’ असे म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलावरच आली आहे.

Two police inspectors have disappeared | दोन पोलीस निरीक्षकच गायब

दोन पोलीस निरीक्षकच गायब


पुणे : ‘हरवले आहेत’ असे म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलावरच आली आहे. अभिलेखावरुन दोन पोलीस निरीक्षक गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या दोन निरीक्षकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. सर्व पोलीस घटकांना अभिलेखावरुन शोध घेऊन माहिती कळवण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
प्रकाश काशिनाथ गदादे आणि प्रदीप नामदेव वाघे अशी त्यांची नावे आहेत. आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी काढलेल्या अतितात्काळ आदेशानुसार, निरीक्षक गदादे आणि वाघे हे राज्याच्या पोलीस दलात सध्या कोठे कार्यरत आहेत याची माहितीच खात्याला नाही. त्यांचे अभिलेख पडताळल्यानंतरही त्यांचा शोध लागत नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two police inspectors have disappeared