शिर्डीजवळ २ भाविक अपघातात ठार

By Admin | Updated: September 5, 2016 04:21 IST2016-09-05T04:21:06+5:302016-09-05T04:21:06+5:30

शिर्डीपासून पाच किलोमीटर अंतरावर राहाता शहरालगत रविवारी सकाळी स्कॉर्पिओ व मालट्रकच्या अपघातात बंगळुरू येथील दोन भाविक ठार झाले

Two people were killed in a road accident near Shirdi | शिर्डीजवळ २ भाविक अपघातात ठार

शिर्डीजवळ २ भाविक अपघातात ठार


शिर्डी/राहाता : शिर्डीपासून पाच किलोमीटर अंतरावर राहाता शहरालगत रविवारी सकाळी स्कॉर्पिओ व मालट्रकच्या अपघातात बंगळुरू येथील दोन भाविक ठार झाले, तर चार गंभीर जखमी झाले.
राहाता येथील शासकीय रुग्णालयासमोर सकाळी हा अपघात झाला़ ट्रकमधून माल उतरवत असताना नगरकडून शिर्डीकडे जाणारी स्कॉर्पियो या ट्रकवर मागील बाजूने आदळली़ अपघात इतका भीषण होता की, ट्रकमध्ये घुसलेली भाविकांची गाडी ओढून काढावी लागली़ स्थानिकांनी जखमींना तातडीने संस्थान रुग्णालयात पोहोचविले़ अपघातात बाळकृष्ण रेड्डी (५५) व हर्षद रेड्डी (२२) हे जागीच ठार झाले, तर राजेश्वरी रेड्डी (५०), संतोष रेड्डी (२८), मोहन रेड्डी (२४) व सुरेश रेड्डी (२८) हे जखमी झाले. अत्यावस्थ राजेश्वरी व मोहन रेड्डी यांना हेल्पिंग हँड ग्रुपच्या सदस्यांनी पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Two people were killed in a road accident near Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.