शिर्डी जवळ स्कॉपिओची ट्रकला धडक, दोन भाविक ठार

By Admin | Updated: September 4, 2016 11:53 IST2016-09-04T11:53:20+5:302016-09-04T11:53:20+5:30

स्कॉर्पिओ गाडी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात बंगलोर येथील दोन भाविक ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले.

Two people were killed near Shirdi near Skopiichi truck | शिर्डी जवळ स्कॉपिओची ट्रकला धडक, दोन भाविक ठार

शिर्डी जवळ स्कॉपिओची ट्रकला धडक, दोन भाविक ठार

ऑनलाइन लोकमत 

शिर्डी, दि. ४ - स्कॉर्पिओ गाडी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात बंगलोर येथील दोन भाविक ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. सकाळी ९.३० च्या सुमारास राहता नजीक हा अपघात झाला. 
 
या अपघातात बाळकृष्ण रेड्डी (५५) व सुरेश रेड्डी (२८) हे जागीच ठार झाले, तर राजेशवरी बाळकृष्ण रेड्डी(50), संतोष रेड्डी(28), मोहन रेड्डी(२५) व हर्षद रेड्डी(22) हे जखमी आहेत.
 
राहाता शहरातील ग्रामीण रुग्णालय समोर हा अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक शिर्डीच्या दिशेने तोंड करून उभा होता, त्याच वेळी पाठीमागून शिर्डीकडे येणाऱ्या स्कॉर्पिओ  गाडीने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. 
 
येथील रहिवासी अमोल तुपे व ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावले, पाठीमागून आलेल्या कुंदन सोनावणे व 108 क्रमांकाच्या गाडीतून दशरथ तुपे, डॉक्टर राहुल चोळके व सुनील डांगे यांनी या सर्वांना शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात हलवले. येथे भाविकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या हेलपिंग हॅन्डचे भाऊ भोसले, दीपक वारुळे, दत्तू गोंदकर, प्रमोद गोंदकर, अशोक सुपेकर यांनी तातडीने रुग्णालयात येऊन माहितीची कार्यवाही सुरु केली.

Web Title: Two people were killed near Shirdi near Skopiichi truck