मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात २ ठार १ जखमी
By Admin | Updated: May 22, 2017 08:15 IST2017-05-22T07:20:59+5:302017-05-22T08:15:16+5:30
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सकाळी ६:૪५ वाजता झालेल्या कारच्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात २ ठार १ जखमी
ऑनालइन लोकमत
लोणावळा, दि. 22 : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सकाळी ६:૪५ वाजता झालेल्या कारच्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ૪ वर लोणावळा महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार MH 14 EP 5550 ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक MH 20 AD 1015 वर समोरील बाजुने जोरात धडकून हा अपघात झाला. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने कारमधील चालकासह एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य एक जण गंभिर जखमी झाला आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत पथकाकडून गाडीत आडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु केले असून जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.