बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली
By Admin | Updated: June 11, 2017 16:32 IST2017-06-11T16:32:01+5:302017-06-11T16:32:01+5:30
नांदेड- हदगाव मार्गावर बसच्या धडकेत दोघे जण ठार झाले असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसही उलटली

बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली
ऑनलाइन लोकमत
नांदेड- नांदेड- हदगाव मार्गावर बसच्या धडकेत दोघे जण ठार झाले असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसही उलटली. बसमधील सर्व 22 प्रवाशी सुखरूप आहेत. खंडु भीमराव भूरके 35 रा करमोडी ता हदगाव , रतन मुंजाजी जवाडे 40 रा कुंभाारवाडी ता कळमनूरी हे दोघे 26 एबी 1584 दूचाकीवरून जात होते. बामणी फाटा येथे महा 26 बीेेएल 2603 बसने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. हदगाव आगाराची बस हदगाव नांदेड जात होती.