वर्ध्यात तीन अपघातात दोन ठार तर 23 जखमी
By Admin | Updated: June 7, 2017 15:39 IST2017-06-07T15:39:36+5:302017-06-07T15:39:36+5:30
हिंगणघाट-वर्धा मार्गावर विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघाताच्या घटनेत दोन जण ठार झाले तर एक गंभीर असून २२ जखमी आहे.

वर्ध्यात तीन अपघातात दोन ठार तर 23 जखमी
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 7 - हिंगणघाट-वर्धा मार्गावर विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघाताच्या घटनेत दोन जण ठार झाले तर एक गंभीर असून २२ जखमी आहे. या घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडल्या. सेलू काटे जवळ ट्रक व ट्रॅव्हल्स अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. तसेच इंझापूर शिवारात ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दिनकर चौधरी रा. सेलूकाटे व इंद्रपाल वाढई रा. इंझापूर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर नेरी (मिर्झापूर) येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रफुल्ल गजानन गेडाम हे गंभीर जखमी झाले. या तीनही अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे.