सागरी पोलिस दलाच्या बोटीवर वीज पडून दोन जखमी
By Admin | Updated: July 7, 2014 14:07 IST2014-07-07T14:07:18+5:302014-07-07T14:07:18+5:30
समुद्र किना-यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या बोटीवर वीज पडून दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची घटना नवी मुंबईतील बेलापूर येथे घडली.

सागरी पोलिस दलाच्या बोटीवर वीज पडून दोन जखमी
ऑनलाइन टीम
नवी मुंबई, दि. ७- समुद्र किना-यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या बोटीवर वीज पडून दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची घटना नवी मुंबईतील बेलापूर येथे घडली. या घटनेत भाजलेल्या कामगारांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेलापूर येथील रेतीबंदर परिसरात सागरी पोलिस दलाला दिलेल्या बोटीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. सोमवारी सकाळी बोटीवर वीज पडून दोघे कामगार जखमी झाले. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.