मोदींचे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी ग्रुप अॅडमीनसह दोघांना अटक
By Admin | Updated: July 15, 2015 17:03 IST2015-07-15T16:43:30+5:302015-07-15T17:03:24+5:30
वॉट्स अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर करणे बुलढाणा येथील दोघांना चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी पोलिसांनी वॉट्स अॅपवरील ग्रुप अॅडमिनसह दोघा जणांना अटक केली आहे.

मोदींचे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी ग्रुप अॅडमीनसह दोघांना अटक
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. १५ - वॉट्स अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर करणे बुलढाणा येथील दोघांना चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी पोलिसांनी वॉट्स अॅपवरील ग्रुप अॅडमिनसह दोघा जणांना अटक केली आहे.
बुलढाणा येथील शेगावातील काही तरुणांनी वॉट्स अॅपवर सुलतान नामक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमधील दोघा सदस्यांनी ग्रुपमध्ये जातीय तेढ निर्माण करणारे पोस्ट शेअर केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह छायाचित्रही या ग्रुपवर शेअर केले जात होते. याप्रकरणी ग्रुपमधील सदस्य शेख सलीम शेख उमर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर शेगाव पोलिसांनी ग्रुप अॅडमिन शेख सलमान शेख रहीम व अन्य दोघा सदस्यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातही भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी ग्रुप अॅडमिन व अन्य एका सदस्याला अटक केली होती. त्यामुळे वॉट्स अॅपग्रुपवर शेअर करताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे असून ग्रुप अॅडमिननेही सदस्यांना ग्रुपमध्ये अॅड करताना खबरदारी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ग्रुपवर सामाजिक तेढ निर्माण करणारे मेसेज टाकणा-यांविरोधात स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी असे पोलिसांनी म्हटले आहे.