अनैतिक संबंधातून दोघांचा खून
By Admin | Updated: September 21, 2015 00:47 IST2015-09-21T00:47:34+5:302015-09-21T00:47:34+5:30
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रविवारी सादिक शब्बास शेख (४९) याने पत्नी व तिचा प्रियकर यांचा सत्तुरने व डोक्यात दगड घालून खून केला.

अनैतिक संबंधातून दोघांचा खून
जामखेड (जि. अहमदनगर) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रविवारी सादिक शब्बास शेख (४९) याने पत्नी व तिचा प्रियकर यांचा सत्तुरने व डोक्यात दगड घालून खून केला.
सादीक शेख (सदाफुले वस्ती) हा मुंबईत गोदीमध्ये कामाला आहे़ तो बांडीवाडी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला(मुंबई) येथे राहात होता़ त्याची पत्नी महुमेदा (४०) हिचे शेजारी राहणाऱ्या सईद मेहबुब शेख (४५) याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती सादिकला समजली़ सादिक यास दोन बायका आहेत़ त्या सख्ख्या बहिणी असून, त्यांच्यातील वाद मिटविण्याचे कारण सांगून सादिक याने पत्नी व तिचा प्रियकर सईद यास जामखेड येथे आणले़ शनिवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले़ त्याने महुमेदा व सईद यांच्यावर सत्तुरने वार केले़ त्यांना घरातून ओढीत बाहेर आणले व तेथे पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप केला, त्यानंतर सादिक तेथून निघून गेला़ पुन्हा तासाभराने तो घटनास्थळी आला़ मेहुण्याने मारल्याचा कांगावा केला़ पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणला.