मुंबईचे दोघे भुशी धरणात बुडाले

By Admin | Updated: July 6, 2015 03:44 IST2015-07-06T03:44:54+5:302015-07-06T03:44:54+5:30

पोहता येत नसतानाही जीव धोक्यात घालून पाण्यात उतरलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा रविवारी दुपारी भुशी धरणात बुडून मृत्यू झाला.

Two of Mumbai's bus falls in the Bhushi dam | मुंबईचे दोघे भुशी धरणात बुडाले

मुंबईचे दोघे भुशी धरणात बुडाले

लोणावळा : पोहता येत नसतानाही जीव धोक्यात घालून पाण्यात उतरलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा रविवारी दुपारी भुशी धरणात बुडून मृत्यू झाला. आठवडाभरात या धरणात बुडून चार जणांचा बळी गेला आहे.
भूपेन धीरज भंडारी (२०) व अनिकेत शहाजी हांडे (२०, दोघे रा. अंधेरी, मुंबई) अशी या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास भूपेन, अनिकेतसह त्यांचा १३ मित्रांचा गट वर्षाविहारासाठी भुशी धरण परिसरात आला होता. पोहता येत नसतानासुद्धा भूपेन व अनिकेत पाण्यात उतरले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two of Mumbai's bus falls in the Bhushi dam