मालवणीतून आणखी दोन तरुण इसिसमध्ये ?
By Admin | Updated: December 22, 2015 16:13 IST2015-12-22T16:13:25+5:302015-12-22T16:13:25+5:30
मालवणी भागातून बेपत्ता झालेले तीन तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याची शक्यता असताना, याच भागातून आणखी दोन तरुण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

मालवणीतून आणखी दोन तरुण इसिसमध्ये ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मालवणी भागातून बेपत्ता झालेले तीन तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याची शक्यता असताना, याच भागातून आणखी दोन तरुण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. अयाझ, मोहसीन आणि वाजीद प्रमाणे हे दोन तरुणही इसिसकडून लढण्यासाठी सिरियामध्ये गेले असण्याची शक्यता आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने बेपत्ता असलेल्या आणखी दोन तरुणांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली आहे. कॉल सेंटरमध्ये कामाला असलेला अयाझ सुलतान (२३) आणि आॅटोरिक्षा चालविणारा मोहसीन सय्यद (२६) व लिंबू विक्रेता वाजीद बशीर शेख (२५) हे तिघेही मालवणी भागातून बेपत्ता झाले आहेत.
अयाझ हा ३० ऑक्टोबरपासून तर इतर मोहसीन व वाजीद हे दोघे १५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. इसिसच्या आकर्षणामुळे जगभरातून अनेक तरुण इसिसमध्ये सहभागी होत आहेत. इसिसचे हे नेटवर्क मोडून काढण्याचे भारतीय तपास यंत्रणांसमोर आव्हान आहे.