दोन महिन्यांचे अर्भक सापडले
By Admin | Updated: July 4, 2016 01:17 IST2016-07-04T01:17:57+5:302016-07-04T01:17:57+5:30
हडपसर येथील शिंदेवस्तीमागील कालव्याच्या कडेला दोन महिन्याचे मृत अर्भक शनिवारी संध्याकाळी आढळून आले.

दोन महिन्यांचे अर्भक सापडले
पुणे : हडपसर येथील शिंदेवस्तीमागील कालव्याच्या कडेला दोन महिन्याचे मृत अर्भक शनिवारी संध्याकाळी आढळून आले. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिंदेवस्ती येथील ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. शिंदेवस्तीच्या पाठीमागील बाजूस महादेव मंदिराशेजारून जाणाऱ्या कालव्याच्या कडेला शनिवारी संध्याकाळी हे अर्भक आढळून आले होते. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अर्भकाच्या अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि हातात पांढऱ्या मण्यांच्या मनगट्या, काळा करदोडा बांधलेला आहे. अंदाजे दोन महिन्यांचे हे अर्भक स्त्री अथवा पुरुष आहे, हे समजून येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.