गोळीबारप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 2, 2015 09:51 IST2015-03-02T02:09:52+5:302015-03-02T09:51:05+5:30

येऊ रमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत उत्साहाच्या भरात राजा अहिरे या पोलिसासह दोघांनी गोळीबार केल्याप्रकरणी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण

Two months into the firing case | गोळीबारप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

गोळीबारप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

ठाणे : येऊ रमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत उत्साहाच्या भरात राजा अहिरे या पोलिसासह दोघांनी गोळीबार केल्याप्रकरणी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने वर्तकनगर पोलिसांनी चौकशी केली आहे. याच चौकशी अहवालाच्या आधारे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास अद्यापही सुरू असून, कोणालाही अटक केलेली नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
येऊरच्या ‘हॉटेल रानवारा’ येथे १७ डिसेंबर रोजी ऊर्जित नागले यांनी त्यांच्या मुलाच्या तसेच अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. रात्री ११.३०च्या सुमारास याच पार्टीमध्ये अहिरे यांच्यासह दोघांनी दोन फैरी झाडल्या. या गोळीबारामुळे एखाद्या व्यक्तीचा जीवही धोक्यात आला असता. या दोघांनीही कोणतीही पर्वा न करता शस्त्राचा गैरवापर करून जिवाला धोका निर्माण केला असता, असे चौकशीत आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक टेळे यांनी सांगितले. घटना घडली त्या वेळी काही पत्रकारही त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांनी ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला दिली.

Web Title: Two months into the firing case