बाल कल्याण समितीचे दोन सदस्य प्रथमच लाचखोरीप्रकरणी जाळ्यात
By Admin | Updated: June 21, 2016 20:08 IST2016-06-21T19:29:30+5:302016-06-21T20:08:35+5:30
वसतीगृहाच्या बाजूने अनुकूल अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना बाल कल्याण समितीच्या दोघा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
बाल कल्याण समितीचे दोन सदस्य प्रथमच लाचखोरीप्रकरणी जाळ्यात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - वसतीगृहाच्या बाजूने अनुकूल अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना बाल कल्याण समितीच्या दोघा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
योगेंद्र सुधाकर कुलकर्णी आणि रामचंद्र रंगनाथ कुंभार अशी त्यांची नावे आहेत़. बाल कल्याण समितीच्या सदस्यांवर लाच घेतल्याप्रकरणी प्रथमच अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे़.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्यांचे मुलामुलींचे वसतीगृह आहे़ या वसतीगृहाच्या संबंधात तक्रार अर्जाची चौकशीचे काम कुलकर्णी आणि कुंभार यांच्याकडे होते़ या चौकशीचा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने अनुकूल द्यावा, यासाठी बाल कल्याण समिीचे सदस्य कुलकर्णी आणि कुंभार यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्या असता ती खरी असल्याचे दिसून आले़. त्यानंतर मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या समोरील स्वामीज हॉटेलच्या तळमजल्यावर सापळा रचण्यात आला़. तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले़.