ठाण्यात दोन विवाहितांचा छळ

By Admin | Updated: June 23, 2016 21:56 IST2016-06-23T20:38:08+5:302016-06-23T21:56:27+5:30

दोन लाखांच्या हुंडयासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली.

Two married housewives in Thane | ठाण्यात दोन विवाहितांचा छळ

ठाण्यात दोन विवाहितांचा छळ

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 23 - दोन लाखांच्या हुंडयासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली. तर दुस:या घटनेत विवाहितेच्या स्त्रीधनाचा अपहार करुन क्षुल्लक कारणावरुन पती आणि सासूने तिचा छळ केल्याचा प्रकार नौपाडयात दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वरनगर भागात राहणा:या भगवान साळवे याचा 28 एप्रिल 2015 रोजी विवाह झाला. सुरुवातीला काही दिवस चांगले गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उपाशी ठेवून तिच्याकडून जादा काम करुन घेण्याचे अघोरी प्रकारही झाले. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करण्यात आली. तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. तसेच तिच्या दागिन्यांचाही अपहार करण्यात आला. याप्रकरणी अखेर तिने 22 जून रोजी पतीसह सासू विमलबाई नणंद राधिका, दीर आकाश आणि शैलेश यांच्याविरोधात गुन्हा छळ, मारहाण करणो, शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
तर दुस-या घटनेत 22 मे 2क्1क् रोजी अमित जुवेकर याचा विवाह झाला. त्याने खारीगाव तसेच चीन येथे वास्तव्याला असतांना त्याच्या पत्नीचा छळ केला. तिची सासू स्वाती जुवेकर यांनीही क्षुल्लक कारणावरुन छळ केल्याचा तिने आरोप केला आहे. सोन्याचे नेकलेस, पाटल्या अशा तिच्या अनेक दागिन्यांचाही त्यांनी अपहार केल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक तृप्ती खळदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Two married housewives in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.