शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीने दिलेले दोन लाख झाले हवालदाराचे; व्याजासह पैसे परत करण्याचे मॅटचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 06:42 IST

तीन वर्षांत दिलेली रक्कम एकूण १ लाख ९३ हजार ६२० रुपये झाली.  पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार ही रक्कम त्यांच्या ग्रॅज्युइटीमधून कापून घेण्यात आली. 

मुंबई : हेड कॉन्स्टेबलला पोलीस प्रशासनाने चुकीने वेतनातून दिलेली अतिरिक्त रक्कम परत घेण्याचे पोलीस महांसंचालकांचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) रद्द केले. नंदकुमार मनोहर पोरे हे पोलीस सेवेतून हेड कॉन्स्टेबल म्हणून २०१९ साली निवृत्त झाले. त्यांच्या ग्रॅज्युइटीमधून १ लाख ९३ हजार ६२० रुपये कापण्यात आले. २०१६ पासून त्यांच्या वेतनात अतिरिक्त रक्कम देण्यात आली.

तीन वर्षांत दिलेली रक्कम एकूण १ लाख ९३ हजार ६२० रुपये झाली.  पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार ही रक्कम त्यांच्या ग्रॅज्युइटीमधून कापून घेण्यात आली. त्याविरोधात पोरे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. कोणतीही पूर्वकल्पना न देता हे पैसे कापण्यात आले. त्यामुळे ते परत करण्यात यावेत, अशी मागणी पोरे यांनी केली.

पोरे यांच्या वेतनात २०१६ पासून चुकीने अतिरिक्त रक्कम देण्यात आली. २०१९ साली ते निवृत्त झाले. तोपर्यंत ही रक्कम त्यांना मिळत होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही रक्कम त्यांच्या ग्रॅज्युइटीमधून थेट कापण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर अशा प्रकारे रक्कम कापून घेता येत नाही, असे मॅटने नमूद केले.

पोरे यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नाही. पैसे परत करण्याच्या लेखी हमीने त्यांना अतिरिक्त रक्कम देण्यात आली नव्हती. निव्वळ चुकीने त्यांच्या वेतनात अतिरिक्त रक्कम मिळत होती. त्यामुळे ही रक्कम त्यांना दोन महिन्यांत परत करण्यात यावी. जेव्हा ही रक्कम परत करण्यात येईल, आजपासून तोपर्यंत त्यावर ९ टक्के व्याज द्यावे, असे आदेश मॅटने पोलीस प्रशासनाला दिले.

टॅग्स :Policeपोलिस