अंबाबाईच्या दर्शनासाठी दोन लाखांवर भाविक

By Admin | Updated: May 29, 2017 04:04 IST2017-05-29T04:04:32+5:302017-05-29T04:04:32+5:30

राज्यासह परराज्यांतून आलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक भाविकांनी रविवारी दिवसभरात करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाचा

Two lakh devotees to visit Ambabai | अंबाबाईच्या दर्शनासाठी दोन लाखांवर भाविक

अंबाबाईच्या दर्शनासाठी दोन लाखांवर भाविक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यासह परराज्यांतून आलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक भाविकांनी रविवारी दिवसभरात करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. गर्दीमुळे मंदिर परिसरासह महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, शिवाजी चौक, आदी परिसर भाविकांच्या मांदियाळीने अक्षरश: बहरला होता.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिराच्या चार प्रवेशद्वारांतून पहाटे ५.३० वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत २ लाख २२ हजार ७५८ भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर शहरातील प्रमुख रस्ते पर्यटक भाविकांच्या जत्थ्यांनी फुलले होते. मंदिर परिसरात मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांना ऊन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळाला होता.

Web Title: Two lakh devotees to visit Ambabai