तीन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार; सात जखमी

By Admin | Updated: November 12, 2014 22:39 IST2014-11-12T22:39:51+5:302014-11-12T22:39:51+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर तवेरा आणि फोर्ड जीपची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चौघे जखमी झाले.

Two killed in three separate accidents; Seven injured | तीन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार; सात जखमी

तीन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार; सात जखमी

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर तवेरा आणि फोर्ड जीपची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चौघे जखमी झाले. मंगळवारी रात्री महाडजवळ चांढवे गावच्या हद्दीत हा अपघात घडला.
विठ्ठल गणपत पाटेकर (47, रा. पार्ले बौद्धवाडी ता. पोलादपूर) असे या अपघातातील मृताचे नाव असून रमेश बाबूराव येरुणकर (चांढवे), सुधाकर रामचंद्र येरुणकर, प्रतिकेश हिराजी पगारे (19, नांगलवाडी), रफीक रऊफ कौचाली (36, चांढवे), रोहन विजय पवार (चालक) हे पाच जण जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
 
खंडाळा घाटात अपघात
4वावोशी : खोपोलीजवळील खंडाळा घाटातील दस्तुरीजवळ टेम्पोचा ब्रेक निकामी होवून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जखमी झाले. पुण्याकडून खोपोली दिशेने  जुन्या मुंबई पुणो मार्गावरून जाणा:या टेम्पोचा (एमएच 11 एएल 814 ) दस्तुरीजवळील अंडा पॉईंटजवळ ब्रेक निकामी झाल्याने खोपोलीत येत असलेल्या मोटारसायकलला (एमएच क्6 एव्ही 5984)  ठोकर मारून टेम्पो रस्त्यालगत पलटी झाला. या अपघातात दुचाकीस्वार हेमंत भिलारी, प}ी अर्चना भिलारी व मुलगा चिन्मय भिलारी हे जखमी झाले. अपघाताची खोपोली पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यात आली आहे.
 
डंपरच्या धडकेने एक ठार
4पनवेल: पनवेलजवळील एनएच 4 रोडवर भरधाव डंपरची धडक पुढे जाणा:या दुचाकीला बसल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
4एनएच 4 बी रोडवरून कुंडेवहाळ जवळून जाणा:या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरची धडक बसली. यात दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

Web Title: Two killed in three separate accidents; Seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.