मुंब्रा बायपास येथे वर टँकर घरावर कोसळून २ ठार

By Admin | Updated: June 11, 2014 13:39 IST2014-06-11T11:29:53+5:302014-06-11T13:39:51+5:30

मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर कोसळून एकाचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत.

Two killed in tanker house at Mumbra Bypass collapsed | मुंब्रा बायपास येथे वर टँकर घरावर कोसळून २ ठार

मुंब्रा बायपास येथे वर टँकर घरावर कोसळून २ ठार

>
ऑनलाइन टीम
ठाणे, दि. ११ - मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी देवरीपाडा येथे झालेल्या या अपघातात केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटला व रस्त्याच्या बाजूस असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला. या अपघातात दोन घरांचे नुकसान झाले असून ढिगा-याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अपघातात मधू प्रभाकर हळदे (वय १५) आणि हरी भिकू चव्हाण (वय ३५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर प्रभाकर हळदे (वय ४०), भारती हळदे ( वय ३५), प्रियांका हळदे (वय १७), शिवाजी दाभाडे (वय ३६), तेजस दाभाडे (वय ४), रुपाली दाभाडे (वय ११) आणि मणीलाल पाल हे सात जण जखमी झाले आहेत. . 
दरम्यान घरांवर उलटलेला हा टँकर उचलण्याचे काम अद्याप सुरू आहे.
 

Web Title: Two killed in tanker house at Mumbra Bypass collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.