राज्यात वीज कोसळून दोन ठार
By Admin | Updated: March 30, 2015 02:30 IST2015-03-30T02:30:00+5:302015-03-30T02:30:00+5:30
नंदुरबारसह बुलडाणा जिल्ह्णाला आवकाळी पावसाने झोडपून काढले. दरम्यान, वीज कोसळून बुलडाणा जिल्ह्णातील चिखली तालुक्यात २३ वर्षीय तरुणाचा

राज्यात वीज कोसळून दोन ठार
नंदुरबार/बुलडाणा : नंदुरबारसह बुलडाणा जिल्ह्णाला आवकाळी पावसाने झोडपून काढले. दरम्यान, वीज कोसळून बुलडाणा जिल्ह्णातील चिखली तालुक्यात २३ वर्षीय तरुणाचा, तर नंदुरबारमध्ये २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला़ ़
नंदुरबारमध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, अंगावर वीज पडल्याने नारंगीबाई भरत पाडवी (२२) ही जागीच ठार झाली.
बुलडाणा जिल्ह्णातील चिखली तालुक्यासह खामगाव व सिंदखेड राजा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, चिखलीच्या भालगाव येथे विहिरीच्या कामावर देखरेखीसाठी गेलेला उमेश गजानन परिहार (२३) व शेतातील अन्य मजुरांनी पावसामुळे शेतातील बाभळीच्या झाडाचा आधार घेतला. त्यावेळी वीज कोसळल्याने उमेश परिहार याचा जागीच मृत्यू झाला, तर विठ्ठल नारायण भगत (३५) हा जखमी झाला. याशिवाय शेतात झाडाला बांधलेल्या तीन म्हशींचा वीज पडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)