पेठ नजिक अपघातात दोन ठार
By Admin | Updated: September 12, 2016 17:44 IST2016-09-12T17:44:12+5:302016-09-12T17:44:12+5:30
बलसाड महामार्गावर पेठच्या कोटंबी गावानजीक ट्रक व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोनही चालक जागीच ठार झाले.

पेठ नजिक अपघातात दोन ठार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पेठ, दि. १२ - बलसाड महामार्गावर पेठच्या कोटंबी गावानजीक ट्रक व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोनही चालक जागीच ठार झाले.
याबाबत आधिक माहिती अशी की, गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशर क्रमांक GJ-15-XX-7881 व नाशिकहून गुजरातकडे जाणारा टँकर क्रमांक यांच्यात कोटंबी गावाजवळ समोरासमोर भीषण टक्कर झाली.
यामध्ये दोन्ही वाहने चक्काचूर झाली. आयशरचालक महेशभाई लक्षूभाई गायकवाड वय -29 रा. पार्डी (गुजरात) व टॅकरचालक राजेश परशुराम पाल वय -35 रा. बालिया ( उत्तर प्रदेश) हे दोघेही जागीच ठार झाले.
अपघाताचा कर्णकर्कश आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डंबाळे, जाधव अधिक तपास करीत आहेत. अपघातामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.